78 हजारांच्या पांढर्‍या सोन्यावर डल्ला


Dalla on white gold worth 78 thousand पहूर : वाकोद गावातील रहिवासी असलेल्या शेतकर्‍याच्या गोठ्यातून चोरट्यानीं सुमारे 78 हजार रुपये किंमतीचा कापूस लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी या प्रकरणी पहूर पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

माहितगार चोरट्यांनी चोरी केल्याचा संशय
रवींद्र भगवान भगत (31, वाकोद, ता.जामनेर) हे शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांचे वाकोद ते तोंडापूर रस्त्यावर शेत असून या शेतात त्यांनी कापूस लावला असून कापूसाची वेचणी करून शेतातील गोठ्यात 13 ते 15 क्विंटल वजनाचा कापूस भाववाढीच्या आशेने साठवून ठेवला होता मात्र गुरुवार, 2 फेब्रुवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोठ्याचा दरवाजा तोडून आत ठेवलेला 78 हजार रुपये किंमतीचा कापूस लांबवला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकरी रवींद्र भगत यांनी पहूर पोलिसात तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हवालदार सुभाष पाटील करीत आहे.


कॉपी करू नका.