भुसावळात पारंपरीक वाद्ये वाजवून अकराव्या खान्देश नाट्य महोत्सवाचे उद्घाटन

उत्कर्ष कलाविष्कारतर्फे आयोजन : तीन दिवस शहरवासीयांना नाटकांची मेजवानी


Inauguration of 11th Khandesh Drama Festival with traditional instruments at Bhusaval भुसावळ : ढोल, डमरु, तुणतुणे, शंख, संबळ, ढोलकी आदी पारंपरीक वाद्ये रंगमंचावरील पाहुण्यांनी वाजवत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने अकराव्या खान्देश नाट्य महोत्सवाचे शुक्रवारी सकाळी उद्घाटन केले. यावेळी सकाळ सत्रात अप्रतिम दोन बालनाट्ये सादर झाली. कृष्णाचंद्र सभागृहात शुक्रवारी सकाळी नानासाहेब देविदास गोविंद फालक स्मृती खान्देश नाट्य महोत्सवाला सुरूवात झाली. अध्यक्षस्थानी ओबेनॉल कंपनीचे संचालक अश्विनकुमार परदेशी होते. ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक यांच्याहस्ते उद्घाटन झाले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी शहर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, ताप्ती एज्युकेशन सोसायटी चेअरमन महेश फालक, यशवंत डेअरीचे संचालक हर्षद महाजन, आनंद ड्रेसेसचे संचालक सुनील जैन, व्यावसायीक विलास चौधरी, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोनु मांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्व.नानासाहेब फालक यांच्या प्रतिमेचे पुजन झाल्यावर पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष अनिल कोष्टी यांनी प्रास्ताविक केले. सचिव धर्मराज देवकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर सुशील पाटील व धनश्री जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

दिवसभरात नाटकांचे सादरीकरण
उद्घाटन सत्रानंतर डॉ उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल निर्मित व धनश्री जोशी दिग्दर्शित षकोर्ट ऑफ कार्लेकर’ या सादर करण्यात आलेल्या बालनाट्यात फास्ट फूड पेक्षा पारंपरीक पौष्टिक आहार चांगला असल्याचा संदेश देण्यात आला. तर अहिल्यादेवी कन्या विद्यालय निर्मित व सोनाली वासकर दिग्दर्शित ‘चम चम चमको’ या बालनाट्यातुन मुलांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडु द्यावे असा संदेश देण्यात आला. तर सायंकाळी जगत थिएटर रत्नागिरी निर्मित व स्वप्नील जाधव दिग्दर्शित ‘निर्वासित’ हे नाटक सादर झाले.

आज ही नाटके होणार सादर
शनिवारी सायंकाळी सात वाजता पुणे निर्मित, ‘संगीत कमली की सत्वपरीक्षा’ हे विनोदी अंगाने जाणारे नाटक सादर होणार आहे तर रविवारी सायंकाळी सात वाजता परीवर्तन, जळगाव निर्मित ‘अमृता साहिर इमरोज’ हे नाटक सादर होणार असून, त्यानंतर लगेचच पुणे निर्मित ‘गावकथा’ हा संगीत नृत्याने सजलेला अंतर्मुख करणारा नाट्यविष्कार पाहायला मिळणार आहे.


कॉपी करू नका.