ट्रक-रीक्षात चिंचोलीनजीक अपघात : दोघे जखमी


Truck-rickshaw accident near Chincholi : Two injured यावल : ट्रक व रीक्षात धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळ अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर शुक्रवारी हा अपघात घडला. अपघातानंतर जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यातील एकाला जबर दुखापत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

एकाची प्रकृती नाजूक
अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर चिंचोली गावाजवळ प्रवासी रीक्षा घेऊन हमीद समशेर तडवी (45, रा.मोहरद, ता.चोपडा) हे चोपड्याकडे जात असताना चोपड्याकडून येणार्‍या ट्रकने चिंचोली गावाजवळ रीक्षाला धडक दिली. या अपघातामध्ये चालक हमीद तडवी व प्रवासी आशाबाई विठ्ठल पाटील (60, रा.देवगाव, ता.चोपडा) हे दोघे जखमी झाले. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारार्थ आणण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण, अधिपरीचारीका नेपाली भोळे, पिंटू बागुल यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. यातील हमीद तडवी यांना पुढील उपचाराकरीता जळगाव हलवण्यात आले.


error: Content is protected !!