चोपड्यात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा : 36 तरुणींची सुटका


Police raid on Kuntankhana in Chopda : 36 young women rescued चोपडा : शहरातील नगरपालिकेच्या मागील परीसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापेमारी करीत 43 महिलांना ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. यातील 36 परप्रांतीय तरुणींची जळगाव महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे तर सात महिलांविरोधात चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. .ही कारवाई चोपडा उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे सहायक पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या पथकाने केली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांना कुंटणखान्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कुंटणखान्यावर छापा टाकला. यावेळी जिल्ह्यातील तसेच परराज्यातील 43 तरुणी आढळल्याने 36 तरुणींना जळगाव सुधारगृहात पाठवण्यात आले असून कुंटणखाना चालवणार्‍या सात महिलांवर रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला.

 


error: Content is protected !!