गायीचे वासरू दारापुढे आल्याच्या रागातून भानगुर्‍यात एकाला मारहाण


A man was beaten up in Bhangurya due to anger that a cow’s calf came in front of the door मुक्ताईनगर : गायीचे वासरू दारापुढे आल्याच्या रागातून एकाला दगड डोक्यात टाकून मारहाण करण्यात आली तसेच शिविगाळ करण्यात आली. ही घटना तालुक्यातील भानगुरा येथे गुरुवारी रात्री पावणेनऊ वाजता घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
शंकर भगवान रायपूरे (23, भानगुरा) यांच्या तक्रारीनुसार गुरुवारी रात्री त्यांच्या गायीचे वासरू आरोपींच्या दारात गेल्यानंतर तक्रारदाराच्या वडिलांना संशयीत शिविगाळ करीत होते व याबाबत शंकर रायपूरे हे समजावण्यास गेल्यानंतर आरोपी जितेंद्र प्रकाश रायपूरे व विजय प्रकाश रायपूरे (दोन्ही रा.भानगुरा) यांनी शिविगाळ करीत मारहाण केली तसेच डोक्याला दगड मारण्यात आला व चाकू काढून दहशत निर्माण करण्यात आली तसेच पिता-पूत्रांना आमच्या नांदी लागल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. तपास नाईक अविनाश पाटील करीत आहेत.


error: Content is protected !!