रावेरमध्ये लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आल्याची अफवा
अफवांवर विश्वास न ठेवू नका -पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे आवाहन
रावेर : शाळेतील मुले पळवून नेणारी टोळी शहरात आल्याचा जोरदार अफवा रावेर शहर व परीसरात पसरल्याने पालकवर्गात खळबळ उडाली मात्र अशी कुठलीही टोळी शहर व परीसरात आलेली नाही त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन रावेर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केले आहे. लहान मुलांना पळवून देण्यात आले शिवाय लहान मुले पळवून देणारी टोळी आली आहे वा दुचाकीवर बसवून लहान मुलांना पळवून नेले जात असल्याच्या निव्वळ अफवा असल्याचे निरीक्षक वाकोडे यांनी कळवले आहे. दरम्यान, नागरीकांनी अफवा पसरविणारे मेसेज कोणत्याही ग्रुपवर टाकू नये, पोलिसांशी शहानिशा करावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.