धुळ्यात पोलिस अधीक्षक कार्यालयात झाली चोरी
A theft took place in the office of the Superintendent of Police in Dhule धुळे : शहरातील पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयातच सफाई कामगारांनी इन्व्हर्टरची बॅटरी लांबवल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी दोन सफाई कामगारांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेली बॅटरी हस्तगत करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक कार्यालयातच चोरी
सूत्रांच्या माहितीनुसार, आकाश बाळू खरात (फाशीपूल) व गफ्फार शेख कासम (मोतीनगर, धुळे) हे पोलिस अधीक्षक कार्यालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते. संधी साधून आरोपींनी महागडी इन्व्हर्टरची बॅटरी नुकतीच लांबवली होती. शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयीतांना अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक कार्यालयातच चोरी झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर मात्र सर्वत्र खळबळ उडाली.

