गुंड आणि माफियांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ पॉलिसी : मुख्यमंत्री आदित्यनाथ योगींच्या वक्तव्यानंतर गुंडाचा खात्मा


‘Zero tolerance’ policy against gangsters and mafias : After Chief Minister Adityanath Yogi’s statement, gangsters will be eradicated लखनौ : उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर गुंड प्रवृत्तींवर चांगलीच जरब बसल्याचे दिसून येते शिवाय त्याचा प्रत्ययही पहायला मिळतो. त्याबाबतचा प्रत्यय पुन्हा समोर आला आहे.शनिवार, 25 फेब्रुवारी) रोजी विधानसभेत विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांनी त्यांना राज्यातील गुन्हेगारीवर बोलण्यास प्रवृत्त केले. त्यांनी उमेश पाल खून प्रकरणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करताच योगी म्हणाले की, माफिया कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना जमीनदोस्त केले जाईल. या त्यांच्या वाक्यानंतरच दोनच दिवसांनी हत्या प्रकरणातील आरोपी चकमकीत मारल्याचे वृत्त समोर आल्याने राज्यात गुंड आणि माफियांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ पॉलिसी असल्याचा प्रत्यय आला आहे.

170 गुन्हेगारांना धाडले यमसदनी
‘योगीराज’ सुरू झाल्यापासून गुंड आणि माफियांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. तुम्ही आकडे बघितले तर योगी सरकारमध्ये मार्च 2017 ते गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत, सुमारे 170 गुन्हेगार मारले गेले आहेत तसेच चार हजार 500 हून अधिक गुन्हेगार पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाले आहेत. गरज पडली तर गाडीही पलटी होईल आणि गोळीही चालेल, असे योगी सार्वजनिक मंचांवर सांगत असतात. बाईकेरूच्या घटनेनंतर मुख्य आरोपी विकास दुबे याचे वाहन उलटून चकमकीत तो ठार झाला. त्याच संदर्भात योगी यांनी हे वक्तव्य केले होते.

उपनिरीक्षकांची हत्या करणार्‍यांचाही कायमचा बंदोबस्त
वाराणसीत तैनात असलेले उपनिरीक्षक अजय यादव यांची गोळ्या झाडून हत्या करून त्यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर लुटण्यात आली तेव्हाही पोलिसांनी आक्रमक वृत्ती दाखवली. पिस्तुल लुटणारे हे हल्लेखोर ऑपरेशन पाताल लोक अंतर्गत चकमकीत मारले गेले. वाराणसीमध्ये बिहारमधील कुख्यात मनीष आणि रजनीश यांना चकमकीत मारणार्‍या पोलिस पथकाला पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !