चाळीसगावात महिलेची दोन तोळ्याची सोनपोत चोरट्यांनी धूम स्टाईल लांबवली


चाळीसगाव (5 जुलै 2026) : चाळीसगावात चोरट्यांनी धूम स्टाईल येत महिलेच्या गळ्यातील सुमारे 76 हजार रुपये किमतीची 20 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लांबवली. ही ा गुरुवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार नीलिमा विकास बागड (52, सप्तशृंगी नगर, भडगाव रोड, चाळीसगाव) या गुरुवार, 3 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 7.20 वाजेच्या सुमारास बाजार करून घरी पायी जात असताना लोखंडवाला कॉम्प्लेक्सजवळ मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाची व 76 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि भरधाव वेगाने भडगाव रोडच्या दिशेने पलायन केले.

या घटनेनंतर नीलिमा बागडे यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !