धुळ्यात तलवारीच्या धाकावर दहशत : आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात


Terror at sword point in Dhule: Accused in crime branch’s net धुळे : धुळ्यातील मोहाडी भागात संशयित तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने कारवाई करीत चार हजार रुपये किंमतीच्या दोन तलवार जप्त केल्या. या प्रकरणी निखील शांताराम अहिरे (27, दंडेवाला बाबा नगर, मोहाडी, धुळे) यास अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश राऊत, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, योगेश चव्हाण, प्रकाश सोनार, राहुल सानप, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !