भुसावळात 25 जोडप्यांचा आंतरजातीय विवाह
चक्रवर्ती सम्राट अशोक फाऊंडेशतर्फे विवाह सोहळ्याचे आयोजन
Chakraborty Samrat Ashok Foundation organized the wedding ceremony भुसावळ : शहरातील चक्रवर्ती सम्राट अशोक फाऊंडेशनतर्फे लिम्पस क्लबमध्ये रविवारी सर्वधर्मीय अंतरजातीय विवाह सोहळ्यात 25 जोडप्यांनी लग्नगाठ बांधली. भुसावळ, रावेर, अकोला, अमरावती, पुणे, मुंबई येथील वर-वधू याप्रसंगी विवाहबद्ध झाली. शहरात प्रथमच आंतरजातीय सामुहिक विवाहाचे आयोजन लिम्पस क्लबमध्ये करण्यात आले.
एकमेकांना समजून करा संसार : मान्यवरांचा सूर
सामूहिक विवाह म्हणजे पैसा व अन्नाची होणारी नासाडी थांबविण्यासाठी सामूहिक विवाह काळाची गरज असून सामूहिक विवाह सोहळ्यातील वधू-वरांनी आनंदाने सुखाने संसार करावा, एकमेकांना समजून घ्यावे, तरच संसार सुखाचा होईल, असा सूर मान्यवरांनी मनोगतातून व्यक्त केला. विवाह सोहळ्यास राजू सूर्यवंशी, प्रशांत तायडे, अॅड.राजेश झाल्टे, कंडारी सरपंच दीपक तायडे, समाज कल्याण विभागाच्या अधिकारी शिला अडकमोल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष विक्की मेश्राम, उपाध्यक्ष रवींद्र तांबे, सचीव प्रमोद पगारे, संघटक अक्षय रगडे, सल्लागार सुरेश इंगळे, राजू गणवीर, आकाश किर्तीकर, राजेश आव्हाड, वाल्मीक देहाडे, संतोष शिरसाठ, रोहीत पवार, नवीन मोरे, सुमंगल अहिरे, विजय बोरे, अरूण खेडकर यांच्याहस्ते विवाह विधी पार पडले.

जोडप्याला मिळणार 20 हजारांचे अनुदान
चक्रवर्ती सम्राट अशोक फाऊंडेशनतर्फे आयोजीत विवाह मेळाव्यातील जोडप्यांना समाज कल्याण विभागातर्फे 20 हजारांचे अनुदान दिले जाणार असल्याचे विक्की मेश्राम म्हणाले. सुमारे एक हजार वर्हाडींनी मेळाव्याला हजेरी लावली.
