भुसावळात उद्या वाढत्या महागाईविरोधात वंचित आघाडीचे आंदोलन
भुसावळ : गॅस सिलिंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसली असून दरवाढीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे घंटानाद व चुलीवर चहा करत केंद्र सरकारचा निषेध गुरुवारी सकाळी 11 वाजता आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे. भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन होणार आहे.
आंदोलनात सहभागाचे आवाहन
या आंदोलनात सहभागाचे आवाहन जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, माथाडी कामगार युनियन जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव टेंभूर्णीकर, महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदना आराक, महिला जिल्हा उपाध्यक्षा मीरा वानखेडे, जिल्हा सचिव विजय मालवीय, भुसावळ तालुका महासचिव गणेश इंगळे, भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव ुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे, अॅड.प्रमोद तायडे, प्रमोद बावस्कर, निलेश जाधव आदींनी केले आहे.

