Maharashtra Budget 2023 महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023 : एस.टी.प्रवासात महिलांना 50 टक्के सवलत, शेतकर्यांसाठी महासन्मान योजना
Maharashtra Budget 2023 : 50 percent discount for women in ST travel, Mahasanman scheme for farmers
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी विविध घोषणा केल्या असून त्यात शेतकर्यांसह महिलांना सर्वाधिक मोठा दिलासा देण्यात आला आहे तर अंगणवाडी सेविकांसह आशा स्वयंसेविकांच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आली आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात शेतकर्यांपासून केली आहे. यामध्ये राज्य सरकारकडून केंद्राच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली आहे.

शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी तीनशे कोटी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान: 50 कोटी दिले जाणार आहेत. मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने : 250 कोटी रुपये, शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन : 300 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
मागेल त्याला शेततळे
मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येत आहे. मागेल त्याला फळबाग, ठिबक, हरितगृह आदींसाठी 1000 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. कोकणात काजू, बोंडू प्रक्रिया केंद्र उभारणार असल्याचे फडणवीस म्हणाले. काजू फळ विकास योजना आजरा आणि चंदगडमध्ये योजना राबविण्यात येणार आहे. तसेच अपघातग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबास दोन लाखांपर्यंत सानुग्रह अनुदान दिले जाईल, असेही फडणवीस म्हणाले.
अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ
आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट
राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत
चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर
कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना
महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार
‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात
लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची…
‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात
मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात
पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ
जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये
अकरावीत 8000 रुपये
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये
महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा
आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्यांकडून
आता शेतकर्यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता
शेतकर्यांना केवळ एक रुपयांत पीकविमा
3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार
