नवापूरजवळ ट्रकचा अपघात ; मंगरूळच्या चालकाचा मृत्यू


Mangalru driver killed after watermelon truck overturns पारोळा : ट्रकद्वारे टरबूज घेवून नवापूरकडे निघालेला ट्रक मातीच्या ढिगार्‍यावर आदळून झालेल्या अपघातात पारोळा तालुक्यातील मंगरुळ येथील चालक राजेंद्र दत्तू पाटील (25) हे ठार झाले तर शेतकरी जखमी झाले. हा अपघात नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्याच्या सोनखांब गावाजवळ गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास घडला.

रात्रीच्या अंधारात अपघात
पारोळा तालुक्यातील मंगरुळ येथील चालक राजेंद्र दत्तू पाटील (25) हे ट्रकमध्ये चोपडा नवापूर तालुक्यातील वेले येथून टरबूज भरून सुरतकडे जात असताना नवापूर तालुक्यातील सोनखांब जवळ हा ट्रक अंधारात मातीच्या ढिगार्‍यावर आदळून उलटला. यात ट्रक चालक राजेंद्र पाटील यांचा मृत्यू झाला तर चोपडा तालुक्यातील वैले येथील शेतकरी रघुनाथ पाटील हे जखमी झाले. यामुळे ट्रकमध्ये भरलेले टरबूज हे महामार्गावर अस्ताव्यस्त विखुरलेले होते. यामुळे शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले. मृत राजेंद्र पाटील यांच्या पश्चात आई व दोन बहिणी असा परीवार आहे.

 


कॉपी करू नका.