शिरपूरातील अट्टल दुचाकी चोरटा जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात : चोरीच्या 14 दुचाकी जप्त


Attal two-wheeler thief in Shirpur in the net of Jalgaon crime branch: 14 stolen two-wheelers seized जळगाव : शिरपूर तालुक्यातील अट्टल दुचाकी चोरट्याच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या बांधत जळगाव जिल्ह्यातील अमळनेरसह मध्यप्रदेशातील चोरलेल्या तब्बल 14 दुचाकी जप्त केल्या आहेत. अजय अंबालाल पावरा (27, वकवड, बोराड, ता.शिरपूर, जि.धुळे) असे अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई 
अमळनेर शहरात चोरीची दुचाकी घेवून संशयित अजय पावरा हा फिरत असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर पथकातील सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश मेढे, संजय हिवरकर, गोरख बागुल, कमलाकर बागुल, संदीप पाटील, संदीप साळवे, पोलीस नाईक प्रवीण मांडोळे, ईश्वर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल लोकेश माळी, अशोक पाटील यांनी कारवाई करत रविवारी अमळनेर शहरातून संशयित आरोपी अजय अंबालाल पावराच्या मुसक्या बांधल्या. आरोपीच्या सखोल चौकशीत त्याने चोरीच्या 14 दुचाकी काढून दिल्या. आरोपीला चोरीच्या दुचाकीसह अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


कॉपी करू नका.