घोडसगाव नदीपात्रातील शिरच्छेद केलेल्या मृताची ओळख पटेना


खुनाची माहिती देणार्‍यास पोलिसांकडून 25 हजारांची बक्षीस : तीक्ष्ण हत्याराने धडावेगळे केले शीर

मुक्ताईनगर : तालुक्यातील घोडसगांव शिवारातील नदीपात्रालगत पूर्णा नदीपात्रात कुंडजवळील पंपिग हाउस येथे 60 ते 65 वयोगटातील वृद्धाचे शिरच्छेद केलेल्या मृतदेहाची अद्यापही ओळख पटलेली नाही. खून करणार्‍या संशयीत इसमाची माहिती देणार्‍यास पोलिस प्रशासनाने आता 25 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. आरोपींनी मृताचे तीक्ष्ण हत्याराने दोघे हात व दोघे पायदेखील धडावेगळे केले असून बेपत्ता पायांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
5 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घोडसगांव शिवारातील पंपिग हाउस जवळ पदीपात्रालगत अनोळखी इसमाचे प्लॉस्टीकच्या पिशवीत मुंडके बांधुन पाण्यात फेकलेले गाठोडे मिळाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शिरच्छेद करून मृतदेह फेकला
सुमारे 60 वर्षीय वृद्धाचा खून करून शीर व हातपाय धडावेगळे करण्यात आले तर मयताचे डोके व धड वेगवेगळे काळ्या रंगाच्या प्लॅस्टीकच्या पिशवीत गाठोडे बांधुन पुर्णानदीच्या पात्रात फेकून देण्यात आल्यानंतर पोलिसांना शीर व धड सापडले असलेतरी मृतांचे दोन्ही हात व दोन्ही पाय मिळालेले नाही. या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी दोन पथकांची निर्मिती करण्यात आली असून त्यांच्याकडून लगतच्या परीसरात अज्ञात मयताबाबत ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तपास पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !