दुग्ध व्यवसाय विकास विभागातील लाचखोर लिपिक एसीबीच्या जाळ्यात
A bribe-taking clerk in Dairy Development Department in ACB’s net मुंबई : विनंती अर्जावरून कर्मचार्याची बदली झाल्यानंतर आदेशाच्या प्रतीसाठी एक लाखांची लाच मागून तडजोडीअंती 30 हजारांची लाच स्वीकारताना दुग्ध व्यवसाय विकास विभागातील वरीष्ठ लिपिक प्रशांत दामोदर अहिर यास अटक करण्यात आली.
एक लाखांचे लाच घेताना कारवाई
तक्रारदार यांची विनंती अर्जावरून बदली झाली होती मात्र बदली आदेशाची प्रत देण्याकरीता अहिरने एक लाखांची मागणी केली. तक्रारदार यांनी गेल्यावर्षी याबाबत 8 ते 9 डिसेंबर रोजी एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार, पडताळणीत तडजोडी अंती 50 हजारांची मागणी केली. पुढे 30 हजारांपर्यंत आला. अखेर, एसीबीने शुक्रवारी याप्रकरणी कलम 7, 7 (अ) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा नोंद करत अधिक तपास करत आहे.
