मुक्ताईनगरात भरधाव बसच्या धडकेने अकोल्यातील प्रौढाचा मृत्यू : चालकाविरोधात गुन्हा


Akola adult dies after being hit by speeding bus in Muktainagar: Case against driver मुक्ताईनगर : भरधाव बसने पादचार्‍याला धडक दिल्याने पादचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना हॉटेल दीपालीनजीक बुधवार, 29 रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. या प्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बसच्या धडकेने प्रौढाचा ओढवला मृत्यू
या घटनेत रणदीप नानाजी तायडे (50, डाबकी रोड, अकोला) यांचा मृत्यू झाला. तायडे हे बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता रमेश बर्‍हाटे यांच्या शेताजवळील दीपाली हॉटेल येथून पायी निघाले असता बस (एम.एच.13 सी.वाय.7971) ने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रीती नंदकिशोर सरोदे (56, अकोला) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिखली आगाराचे बस चालक पंकज छत्रपती इंगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !