भुसावळात ‘आनंदाच्या शिधा’ने फुलवले लाभार्थींच्या चेहर्‍यावर हास्य

सणानंतर का होईना लाभार्थींना दिलासा : भुसावळात 38 हजार लाभार्थींना मिळणार लाभ


In Bhusawal, ‘Anandache Shidha’ bloomed smiles on the faces of the beneficiaries भुसावळ :गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय नुकताच मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला होता मात्र गुढीपाडवा सण उलटूनही लाभार्थींना आनंदाचा शिधा न मिळाल्याने त्यांच्यात नाराजीची भावना होती मात्र नुकताच शिधा उपलब्ध झाल्याने त्याचे वाटप शहरासह तालुक्यात सुरू करण्यात आले आहे.

शंभर रुपयात ‘आनंदाचा शिधा’
अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारीद्य्र रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना एक किलो रवा, एक किलो चनाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे 100 रुपये प्रतिसंच देण्याचे सरकारचे नियोजन असलेतरी वेळेत पुरवठा न झाल्याने गुढीपाडवा सणाला आनंदाचा शिधा लाभार्थींना मिळालाच नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

38 हजार 500 लाभार्थींना मिळणार शिधा
शुक्रवारी शहरातील श्री महाशक्ती महिला बचत गट स्वस्त धान्य दुकान क्रमांक 49 येथे आनंदाच्या शिधाचे भुसावळचे तहसीलदार दीपक धीवरे यांच्याहस्ते लाभार्थींना वितरण करण्यात आले. पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांच्या माहितीनुसार, 15 हजार किलो रवा, 10 हजार 20 किलो साखर व चनादाळ तसेच पामतेल 38 हजार 500 लीटर पामतेल उपलब्ध झाले असून त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे तर अन्य वस्तूंचा लवकरच पुरवठा होणार आहे.

लाभार्थींनी नोंदवावा अभिप्राय
भुसावळ शहर व तालुक्यातील 126 दुकानांना जोडण्यात आलेल्या 38 हजार पाचशे लाभार्थींना (अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना) आनंदाचा शिधा मिळणार आहे. प्रत्येक दुकानासमोर बॅनर लावण्यात आले असून त्यावरील क्यूआर स्कोड स्कॅन केल्यानंतर वेबपेजवर लाभार्थींनी अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांनी केले. ते म्हणाले की, वेबपेजवर लाभार्थींचा अभिप्राय विचारला जातो व त्यात आनंदी आहात का, आनंदाचा शिधाचा दर्जा नेमका कसा? याबाबत माहिती जास्तीत-जास्त लाभार्थींनी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !