जळगावातील प्रौढाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू
An adult in Jalgaon died after being hit by a train जळगाव : रेल्वेची धडक बसल्याने शहरातील देविदास श्रीपत काकडे (45, केसी पार्क शिवाजीनगर, जळगाव) यांचा मृत्यू झाला. शहरातील शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या खाली माल धक्याजवळ शुक्रवारी ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी मयताच्या हातावर गोंदलेल्या नावावरून ओळख पटवली. या प्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलिसात कस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
हातावरील गोंदलेल्या नावावरून पटली ओळख
जळगाव शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाखाली माल धक्क्याजवळ अप रेल्वे लाईनवर अनोळखी व्यक्तीचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर रेल्वे पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. मयताच्या उजव्या हातावर देविदास असे गोंदलेले असल्याने त्याद्वारे ओळख पटवण्याचे आवाहन केल्यानंतर ओळख पटवण्यात यश आले. मयत काकडे हे जळगाव जिल्हा कोर्टसमोर अल्फा मेडीकलवर कामाला होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परीवार आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामराव इंगळे करीत आहे.
