साकळी-शिरसाड रस्त्यावर दुचाकीच्या धडकेने कल्याणचा वयोवृद्ध जखमी


An elderly person injured in a collision with a bike on Sakhli-Shirsad road यावल : तालुक्यातील साकळी येथे शिरसाड या रस्त्यावर एका दुचाकीस अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिल्याने अपघातात 68 वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाला व मोटरसायकलचे नुकसान झाले. अपघातानंतर अज्ञात दुचाकीस्वार हा तेथून पसार झाला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल
साकळी, ता.यावल या गावातून प्राथमिक आरोग्य केंद्राजवळून शिरसाड जाणारा रस्ता असून या रस्त्यावर दुचाकी (क्रमांक एम.एच.05 ए.डी.7527) ने सुरेश नागो अत्तरदे (68, रा.कल्याण, मुंबई) हे जात असताना त्याचवेळी शिरसाडकडून साकळीकडे भरधाव वेगाने दुचाकी (क्रमांक एम.एच. 19-4146) वरील चालकाने अत्तरदे यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातानंतर सुरेश अत्तरदे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. या प्रकरणी विद्या सुरेश अत्तरदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !