साळवा गावातील तरुणाची गळफास घेत आत्महत्या
A young man of Salwa village committed suicide by hanging himself धरणगाव : तालुक्यातील साळवा येथील एका 31 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रवीण धोंडु इंगळे (31, साळवा, ता.धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.
धरणगाव पोलिसात नोंद
प्रवीण इंगळे या तरुणाने बंडू विठ्ठल ढाके (साळवा, ता.धरणगाव) यांच्या साळवा शिवारातील शेताच्या बांधावरील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. शनिवारी सकाळी साधारण 9 वाजेच्या सुमारास गावकर्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी धरणगाव पोलिसांनी कळवल्यानंतर मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस नाईक चंदुलाल सोनवणे करीत आहेत.
