समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : मालेगावातील डॉक्टर तरुणींसह तिघे ठार
Fetal accident on Samriddhi Highway: Malegaon doctor and three young women killed वर्धा : भरधाव कारने ट्रकला मागून धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात मालेगावातील दोघा डॉक्टर तरुणींसह काचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात डॉ.ज्योती क्षीरसागर (रा.मालेगाव, जि.वाशीम), डॉक्टर फाल्गुनी सुरवाडे (राहणार-अमरावती) आणि भरत क्षीरसागर (रा.मालेगाव, जि.वाशीम) यांचा मृत्यू ओढवला. वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात समृद्धी महामार्गावर हा अपघात घडला.
नागपूरला जाणार्या डॉक्टरांवर क्रुर काळाचा घाला
समृद्धी महामार्गाने नागपूरच्या दिशेने जातं असलेल्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या कारने मागून जबर धडक दिली. या भीषण अपघातात मालेगाव येथून नागपूरला जातं असलेल्या कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणींसह एकाचा जागीच मृत्यू झाला. ज्योती क्षीरसागर आणि फाल्गुनी सुरवाडे या दोन्ही डेंटिस्ट डॉक्टर असून मैत्रीण आहेत. नागपूरला कामानिमित्त रात्री समृद्धी महामार्गाने जात असताना ज्योती क्षीरसागर यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असलेली कार ही समोरील ट्रकला मागून धडकली. घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांनी कर्मचार्यांसह घटनास्थळी पोहोचत वाहतूक सुरळीत केली.
