32 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून


Series of murders continue in Jat : Youth killed with sharp weapon सांगली : जतमध्ये खुनाची मालिका कायम असून सचिन उर्फ शशिकांत बिरा मदने ( 32) याचा धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. खुनाचे कारण अस्पष्ट आहे. जत जवळील अथणी रोडवरील यल्लमा देवीच्या विहिरीकडे जाणार्‍या रोडवर जत येथील मदने वस्तीवरील तरुणाच्या संपर्कात मारेकरी असल्याची माहिी आहे.

चालकाच्या खुनाने खळबळ
सचिन उर्फ शशिकांत बिरा मदने हा व्यवसायाने ड्रायव्हर होता. तो यल्लामादेवी मंदीराजवळ मदने वस्ती येथे राहत होता. रात्री मदने हा आपल्या घरी नव्हता. त्यास दारूचे व्यसन असल्याचे सांगण्यात आले. पहाटे फिरायला जाणार्‍या लोकांना त्याचा मृतदेह आढळला. यल्लमा देवीच्या विहिरीकडे जाणार्‍या रोडवर विहिरी पासुन अलीकडे 200 मीटर अंतरावर ही घटना घडली आहे.

पंधरा दिवसात आठवा खून
मारेकरी हा रात्रीपासून त्याच्या भ्रमण ध्वनीद्वारे सारखा संपर्कात होता. तो रात्रभर घरी नव्हता. नातेवाईकांनी शोध घेतला, मात्र सापडला नाही. आज सकाळी त्याचा मृतदेह आढळला. जागेवर जाऊन पोलीसांनी पंचनामा करुन त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसांत जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठवा खून आहे. त्यामुळे जत परीसरात खुनाची मालिका सुरूच आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !