गांजा तस्करीची माहिती देत भुसावळात सुरक्षा यंत्रणांंचे झाले ‘एप्रिल फुल’


भुसावळ : पवन एक्स्प्रेसमधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना देत प्रवाशाने यंत्रणांचे एप्रिल फुल केल्याची घटना रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक चारवर घडली.

दोन प्रवाशांच्या वादात यंत्रणा वेठीला
झाले असे की, दोन प्रवाशांचे वाद झाल्यानंतर एकाने रेल्वे कंट्रोलला माहिती देत संबंधित व्यक्तीजवळ गांजा असल्याची माहिती दिली. त्यानंतर शुक्रवारी रात्री पवन एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म चारवर येण्यापूर्वी मोठा ताफा जमला. गाडी येताच रेवे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी मिळेल त्या माहितीच्या आधारावर तपासणी सुरू केली मात्र काहीही मिळाले नाही. यावेळी पोलिसांनी माहिती जाणून घेतली असता, गाडीत दोन प्रवाशांचा वाद झाल्यानंतर एका प्रवाशाने दुसर्‍याला त्रास होण्यासाठी नियंत्रण कक्षाला माहिती दिल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारानंतर पोलिसांनी तक्रार करणार्‍यांची चांगलीच कान उघाडणी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !