भुसावळात भगवान महावीर जन्मोत्सवानिमित्त उद्या सायकल रॅली


भुसावळ : जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांची जयंती शहरात सकल जैन समाजाकडून साजरी करण्यात येणार असून या निमित्त विविध कार्यक्रमांचे सोमवारी आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी सात वाजता नाहटा कॉलेज ते गांधी चौकापर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे तसेच मंगळवार, 4 एप्रिल रोजी सकाळी श्री 1008 भगवान महावीर स्वामी यांचा अभिषेक तसेच ध्वजारोहण, मंगलाचरण करण्यात येईल व त्यानंतर शहराचे मुख्य मार्गाने शोभायात्रा काढण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी संतोषीमाता हॉलमध्ये समता बहुमंडलकडून तसेच समाज बांधवांकडून कार्यक्रम होतील.

4 रोजी विविध कार्यक्रम
4 रोजी सायंकाळी, ओजस्वी प्रवक्ता हुकुमचंदजी सावला, इंदौर, यांच्याकडून ‘वीर प्रभू के वीरो की गाथा’ या विषयवार मार्गदर्शन करण्यात येईल. उत्सवात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री 1008 भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक महोत्सव समिती भुसावळ व सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !