ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये न आणल्याने विवाहितेचा छळ : पतीसह चौघांविरोधात गुन्हा
Harassment of a married woman in Fatehpur for five lakhs : Crime against four persons including husband पहूर : ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये न आणल्याने फत्तेपूर येथील माहेर व बोरद, ता.नंदुरबार येथील विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी पहूर पोलिसात पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोरदच्या चौघांविरोधात गुन्हा
जळगाव तालुक्यातील फत्तेपूर येथील माहेर असलेल्या वर्षा निलेश पाटील यांचा विवाह नंदुरबार जिल्ह्यातील बोरद येथील निलेश लक्ष्मण पाटील यांच्यासोबत 2011 मध्ये रीतीरीवाजानुसार झाला. लग्नानंतर काही महिने चांगले गेल्यानंतर विवाहितेला माहेरून पैशांची मागणी करण्यात आली. त्यानंतर पाच लाख रुपये ट्रॅक्टर घेण्यासाठी आणावे, असा तगादा पती निलेश लक्ष्मण पाटील यांनी केला. दरम्यान सासू-सासरे यांनी देखील पैशांची मागणी करत त्रास दिल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. या संदर्भात शनिवार, 1 एप्रिल रोजी सायंकाळी पहूर पोलिसात पती निलेश लक्ष्मण पाटील, अर्चना कमलेश पाटील, कमलेश पुरुषोत्तम पाटील आणि चुनीलाल शंकर सूर्यवंशी (सर्व राहणार बोरद, ता.तळोदा) यांच्या विरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण चौधरी करीत आहे.
