किनगावातील ट्रक चालकाचा खून : सुनेसह प्रियकराला तीन दिवसाची पोलिस कोठडी
Murder of a truck driver in Kingaon: Son-in-law along with boyfriend sent to police custody for three days यावल : किनगाव येथील 58 वर्षीय इसमाचा तिच्या सुनेच्या सांगण्यावरून उदळी येथील 28 वर्षीय तरुणाने खून केला होता. पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर त्यांची पोलिस कोठडीतच रवानगी होती. कोठडी संपल्यावर दोघांना शनिवारी यावल न्यायालयात हजर केले असता त्यांना पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
दोघा संशयीतांची कोठडीत रवागनी
किनगाव, ता.यावल येथील भीमराव सोनवणे (58) यांची हत्या झाल्याचे 24 मार्च रोजी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मयताची सून मीनाक्षी विनोद सोनवणे व तिच्या बहिणीने मानलेला मुलगा जावेद शाह अली शाह फकीर (28, रा.उदळी) या दोघांना ताब्यात घेतले होते. यात जावेद शाह याने मीनाक्षी सोनवणे याच्या सांगण्यावरून भिमराव सोनवणे यांची हत्या केल्याची कबुली दिली होती व दोघांना यावल न्यायालयाने सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. शनिवारी पोलिस कोठडी संपल्यावर या दोघांना यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्या.एम.एस.बनचरे यांच्यासमोर हजर केले असता दोघांना 3 एप्रिलपर्यंत पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार भूषण चव्हाण, निलेश वाघ करीत आहेत.
