अट्रावल दंगल : 205 दंगलखोरांविरोधात गुन्हा

गावात तणावपूर्ण शांतता : अटकेतील 20 संशयीतांची न्यायालयाने केली पोलिस कोठडीत रवानगी


Atraval riots : 205 cases against rioters भुसावळ : बारागाड्यांवर युवकांना बसू न दिल्याच्या रागातून दुसर्‍या दिवशी वाद उफाळून आल्यानंतर अट्रावल, ता.यावल येथे दोन समाजात दंगल उसळली होती. दोन्ही बाजूने झालेल्या दगडफेकीत पोलिस अधिकार्‍यांसह नऊ जण जखमी झाले होते तर महापुरूषांच्या पुतळ्याची विटबंनादेखील झाली होती. पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करीत दंगलीवर नियंत्रण मिळवल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा स्वतंत्र चार फिर्यादीद्वारे 205 दंगल खोरांविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात 51 जणांविरुद्ध अट्रॉसिटी, 57 जणांविरूध्द दंगल, 93 जणांविरूध्द शासकिय कामात अडथळा आणल्याचा तर चार जणांविरूध्द शस्त्र कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील नऊ तर इतर गुन्ह्यातील 11 अशा 20 संशयीतांना अटकेनंतर न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. गावात तणावपुर्व शांतता असुन गावात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

पहिल्या तक्रारीत दंगल व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा
अट्रावल, ता.यावल या गावात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती व दंगल घडली होती. या प्रकरणी पहिली तक्रार दिवाकर तायडे यांनी दिली. त्यानुसार, संशयित हेमंत कोळी, हितेश कोळी, समाधान कोळी, शेखर कोळी, विजय कोळी, दीपक कोळी, काल्या कोळी, हेमंत कोळी, पंकज कोळी, आकाश कोळी, सुरेश कोळी, विजय कोळी, कुंदन कोळी, किशोर कोळी, खबा कोळी, सुपडू कोळी, रामा कोळी, चेतन कोळी, आकाश कोळी, सागर बाविस्कर, लखन कोळी, नामदेव कोळी, योगेश कोळी, किरण कोळी, अर्जुन कोळी, मयूर कोळी असोदेकर, रवींद्र कोळी, योगेश कोळी रसवंती वाला, निलेश कोळी, बुधो कोळी, विशाल कोळी, दादू कोळी, ममता कोळी, मनीषा कोळी, अंजना कोळी, रेखा कोळी, सखुबाई कोळी, वैशाली कोळी, सुवर्णा कोळी, लता कोळी, लिलाबाई कोळी, अलका कोळी, कल्पना कोळी, दीपाली कोळी, दीपाली किशोर कोळी, मंदा कोळी, मंगल कोळी, जितेंद्र मोरे, कैलास कोळी, पंकज कोळी या 51 तर इतर 25 अज्ञात व्यक्तींविरोधात अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हचा तपास डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !