सावदा शहरात बंद घर टार्गेट : एक लाख 10 हजारांचा ऐवज चोरीला
Daring burglary worth half a lakh in Savada city सावदा : बंद घराला चोरट्यांनी टार्गेट करीत धाडसी घरफोडी केल्याची घटना शहरातील सोमेश्वर नगरात घडली. चोरट्यांनी बंद घरातून एक लाख 10 हजारांचा ऐवज लांबवल्या प्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
शहरातील सोमेश्वर नगरात बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त कर्मचपारी देविदास गंभीर तायडे हे आपल्या पाीवारासह वास्तव्याला आहे. देविदास तायडे यांनी नुकतेच नवीन घर बांधल्याने घरातील सामान शिप्टींगचे काम सुरू होते. बंद घर असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील 60 हजार रुपये किंमतीची व दोन तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत आणि 50 हजारांची रोकड असा एकूण एक लाख 10 हजारांचा ऐवज लांबवला.

सावदा पोलिसात गुन्हा
देविदास तायडे यांचा मुलगा हा 30 मार्च रोजी सकाळी 9 वाजता घरी आला त्यावेळी घराचे कुलूप तोडलेले दिसून आले तसेच चोरट्यांनी घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त केल्याले घरफोडीची खात्री झाल्यानंतर सावदा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. याप्रकरणी सावदा पोलिसात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक जयसिंग राठोड करीत आहेत.