जुन्या वादातून जळगावात तरुणावर प्राणघातक हल्ला
A youth was assaulted in Jalgaon due to an old dispute जळगाव : जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरूणावर धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मरण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शहरातील टॉवर चौकात रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. यातील संशयिताला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जुन्या वादातून हल्ला
छत्रपती संभाजीनगर येथील मूळ रहिवासी असलेल्या विक्की सांडू यादव (25) हा काही दिवसांपासून जळगावात वास्तव्यास असून मालवाहू वाहनाने हमाली काम करून तो स्वतःचा उदरनिर्वाह करतो. रविवार, 2 एप्रिल रोजी रात्री 9 वाजेच्या जुन्या वादातून टॉवर चौकात विक्की व संशयितय विवेक किशोर मराठे यांच्यात वाद झाले. वाद वाढल्याने विक्की यादव याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी धाव घेत विवेक किशोर मराठे याला ताब्यात घेतले. जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि नंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
