सरपंच पद रद्द होण्याचा अर्ज दिल्याच्या रागातून कानळद्यात तरुणावर चाकूहल्ला
A youth was stabbed in Kanalda due to the anger of filing an application to cancel the post of Sarpanch जळगाव : सरपंचपद रद्द होण्यासाठी अर्ज केल्याच्या रागातून सहा जणांनी तरुणाला बेदम मारहाण करीत न चाकूने हातावर वार केला. ही घटना जळगाव तालुक्यातील कानळदा येथे घडली. या संदर्भात जळगाव तालुका पोलिसात रविवारी रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रार दिल्याच्या रागातून चाकू हल्ला
जळगाव तालुक्यातील कानळदा गावातील आनंद सपकाळे यांनी गावातील सरपंच पुंडलिक सपकाळे यांच्या विरोधात तक्रार दिली होती. यात सरपंचपद रद्द करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्याने त्याचा राग मनात ठेवून निखील संतोष सपकाळे, विलास नारायण सपकाळे, पुंडलिक तुळशीराम सपकाळे, प्रमोद मधुकर चव्हाण, राजू मिस्तरी आणि नारायण शंकर सपकाळे (सर्व रा. कानळदा) यांनी आनंद सपकाळे यांचा भाचा चेतन विजय साळुंखे (25, रा.कानळदा) यास छोट्या चाकूने गंभीर दुखापत केली तर इतरांनी चापटा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या संदर्भात रविवारी रात्री नऊ वाजता जळगाव तालुका पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे
