भांडणाचा जाब विचारल्याने जळगावात सफाई कर्मचार्‍यावर प्राणघातक हल्ला : चौघांविरोधात गुन्हा


Jalgaon municipal cleaning worker assaulted: Crime against four  जळगाव : लहान भावासोबत भांडण झाल्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून महापालिकेत सफाई कामगाराला चौघांनी लोखंडी रॉडसह लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना गुरूनानक नगरात सोमवारी दुपारी चार वाजता घडली. य ाप्रकरणी शनीपेठ ठाण्यात तीन तरुणांसह एका अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

भांडणाचा जाब विचारल्याने मारहाण
विशाल सुभाष पवार (34, गुरुनानक नगर, जळगाव) हा तरुण महापालिकेत सफाई कामगार असून त्यांच्या लहान भावाचे भांडण झाल्याने संशयितांना विचारणा केल्यानंतर रामदेवजी बाबा मंदिराजवळ सागर रमेश गोयर (20), पियुष पंडीत गोयर (18), प्रथम पंडीत गोयर (19, सर्व रा.गुरुनानक नगर, जळगाव) व एक अल्पवयीन अशानंनी शिविगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर सागर गोयर व इतर दोघांनी लोखंडी रॉडने विशाल याच्या पाठीवर तसेच उजव्या हातावर मारहाण करीत दुखापत केली. या घटनेत विशाल हा जखमी झाला आहे. या प्रकरणी सोमवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास जखमी विशालच्या चौघांविरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक मनोज येऊलकर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !