चाळीसगावात घटस्फोटीत महिलेवर नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार
चाळीसगाव : शहरातील 29 वर्षीय महिलेला नोकरी लावून देण्याचे आमिष देत तरुणाने वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना शहरातील एका भागात उघडकीस आली आहे. महिलेच्या असहायतेचा फायदा देवून, एक लाख रूपयाची लुट देखील आरोपीने केली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात आसीफ हुसेन खान (४५, रा.नवा इस्लामपुरा, छोटी गुजरी, चाळीसगाव) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जबरदस्तीने नैसर्गिक व अनैसर्गिकरित्या केला अत्याचार
शहरातील एका भागातील २९ वर्षीय महिलेशी आसीफ हुसेन खान (४५) याने महिलेच्या असहायतेचा फायदा घेवून, तिच्याशी ओळख निर्माण केली. तिला नोकरी लावण्याचे आमिष दाखवत एक लाख रूपये घेतले, शिवाय जुन २०२१ पासून शिवीगाळ करुन, जिवे ठार मारण्याची धमकी देत, तिच्याशी जबरदस्तीने नैसर्गिक व अनैसर्गिकरित्या अत्याचार केला. या प्रकाराला कंटाळून शेवटी महिलेने घर सोडून अन्य ठिकाणी वास्तव्य केले, तेथेही आसीफ खान याने सदर महिलेला शारिरीक सबंध कायम न ठेवल्यास तिला व तिच्या मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला. अखेर या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या महिलेने शहर पोलिस स्टेशनला धाव घेत फिर्याद दिल्याने आसिफ हुसेन खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बिरारी करीत आहेत.
