मुंबईतील तरुणाचा जळगावातील होस्टेलमधून लॅपटॉप चोरीला
जळगाव : विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रूममधून ४५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात सोमवारी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जयेश भिकू मालसुरे (१९, रा. नवी मुंबई, ह.मु. उत्तर महाराष्ट्र) विद्यापीठातील मुलांचे होस्टेल हे वास्तव्याला आहे. विद्यापीठात तो शिक्षण घेत आहे. दरम्यान सोमवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या खोलीतून ४५ हजार रुपये किंमतीचा विस्टन कंपनीचा लॅपटॉप आणि चार्जर लांबवला. या संदर्भात जयेश मालसुरे या विद्यार्थ्याने सोमवारी रात्री ११ वाजता धरणगाव पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गजानन महाजन करीत आहे.
