नशिराबाद येथे गो मांस विक्रीची माहिती दिल्याच्या वादातून पोलिसांसह तरुणाला मारहाण
जळगाव : तालुक्यातील नशिराबाद गावातील मन्यार मोहल्ला येथे गोमांस विक्री वरून झालेल्या वादातून तरूणाला मारहाण करून पोलिसांशी धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच आरोपी विरोधात गुन्हा
जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील मन्यार मोहल्ला येथे गोमांस विक्री होत असल्याची माहिती सागर पुरूषोत्तम कापुरे (३२, रा. जुने जळगाव) याने नशिराबाद पोलिसांना दिल्याच्या संशयावरून सोमवारी सकाळी ८ वाजता नशिराबाद येथील शेख मुस्ताक शेख मुसा कुरेशी, जमील अहमद शेख मुसा कुरेशी, आरिफ खान तसलीम खान, आरीफ खान याची आई आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी सागर कापुरे याला बेदम मारहाण केली. त्यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सहाय्यक फौजदार हसमत अली बशीर अली सैय्यद आणि पोलीस नाईक सुधीर रघुनाथ विसपुते यांनीदेखील धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला. या प्रकरणी सकाळी १० वाजता शेख मुस्ताक शेख मुसा कुरेशी, जमील अहमद शेख मुसा कुरेशी, आरिफ खान तसलीम खान, आरीफ खान याची आई आणि एक अनोळखी व्यक्ती (सर्व रा. नशिराबाद ता.जि.जळगाव ) यांच्या विरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


