अट्रावल दंगलीतील संशयिताना यावलला आणताना पोलिसांचे वाहन उलटले : उपनिरीक्षकासह पाच जण जखमी


Police vehicle overturns while bringing Atraval riot suspects to Yaval : Five injured, including sub-inspector नशिराबाद : यावल तालुक्यातील अट्रावल येथे महापुरूषांच्या विटंबना केल्यानंतर दोन गटात झालेल्या दंगलीप्रकरणातील तीन संशयिताना धरणगाव येथून ताब्यात घेवून पोलिस वाहन यावलकडे येत असतना खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात उलटले. ही घटना बुधवारी सकाळी कडगाव रस्त्यावर घडली. या अपघातात पोलिस उपनिरीक्षकासह पोलिस व कर्मचारी व अन्य तीन संशयित जखमी झाले. जखमींवर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

संशयीतांना आणताना वाहन उलटले
अट्रावल गावातील दंगलीतील संशयित धरणगाव तालुक्यात असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी पहाटेच यावल पोलिस संशयितांना ताब्यात घेऊन यावलकडे निघाले होते. परंतू सकाळी 7 वाजेच्या सुमारास कडगाव रस्त्यावरील खड्डयांमुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन रस्त्याच्याकडेला पलटी झाले.

या अपघातात पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे आणि पोलीस कॉन्स्टेबल अशोक बाविस्कर हे जखमी झाले. तर तिन्ही संशयित हे किरकोळ जखमी झाले. पोलिसांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून संशयितांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !