वराडसीमच्या विवाहितेचा विनयभंग : तरुणाविरोधात गुन्हा
Varadsim’s Spousal molestation : A Crime Against a Youth भुसावळ : तालुक्यातील वराडसीम येथील 44 वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीताला अटक करण्यात आली. इब्राहिम उर्फ टीपू उर्फ टिप्या सत्तार मण्यार (24) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.
सलग दोन दिवस विनयभंग
44 वर्षीय पीडीतेच्या तक्रारीनुसार, इब्राहिम उर्फ टिप्या याने 4 व 5 रोजी गावातील सार्वजनिक ठिकाणी तसेच गल्लीत विवाहितेचा विना क्रमांकाच्या दुचाकीवरून पाठलाग करीत विनयभरग केला तसेच स्त्री मनाला लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले. या प्रकाराने पीडीतेने बुधवारी दुपारी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर टिप्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.


