जळगावात भांडणात मध्यस्थी करणार्‍या तरुणावर चाकूहल्ला : संशयीतांनी दुचाकीही पेटवली


Knife attack on youth mediating dispute in Jalgaon : Suspects also set fire to bike जळगाव : वादात मध्यस्थी करणार्‍या तरुणावर कोंबडी कापण्याच्या सुर्‍याने चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना शहरातील सुप्रीम कॉलनीत घडली व त्यानंतर संशयीतांनी तरुणाची दुचाकी पेटवून देण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

वादाचे कारण विचारताच केला चाकूहल्ला
जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीत आसीफ खान यासीन खान (25) हा तरुण परीवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार, 7 एप्रिल रोजी रात्री आठ वाजता त्यांच्या गल्लीत राहणारे तारीख पटेल आणि इमरान खाटीक व रेहान खाटीक यांचा वाद सुरू असताना आसीफ खान याने विचारले की, ‘काय झाले’ व याचा राग आल्याने इम्रान अजीज खाटीक, रेहान इमरान खाटीक, रईस गुलाब पटेल आणि जुनेद गुलाब पटेल (सर्व रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांनी आसीफ खान याला बेदम मारहाण केली तसेच घरातून कोंबडी कापण्याचा लोखंडी सुरा आणून त्याच्या हातावर वार केले. शिवाय मध्यरात्री त्याची दुचाकी (एम.एच.19 डी.एस.7969) वर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला पेटवून दिले.

हा प्रकार 7 एप्रिल रोजी रात्री आठ वाजता व 8 रोजी रात्री 2.10 वाजता घडला. हा प्रकार घडल्यानंतर शनिवारी रात्री नऊ वाजता आसीफ खान याने एमआयडीसी पोलीस पोलिसात इमरान अजीज खाटीक, रेहान इम्रान खाटीक, रईस गुलाब पटेल आणि जुनेद गुलाब पटेल या चौघांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार महेंद्रसिंग पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !