पिंप्रीत भाऊबंदकी उफाळली : भावावर विळ्याने केला वार
In a minor dispute, a brother was stabbed with a sickle; Incident in Pimpri धरणगाव : तालुक्यातील पिंप्री येथे दोघा भावांमुळे किरकोळ कारणावरून वाद उफाळल्याने मोठ्या भावाने लहान भावावर विळ्याने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवार, 5 रोजी सायंकाळी आठ वाजता घडली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मोठ्या भावाविरोधात गुन्हा
सुनील गोकुळ बडगुजर (32, रा.पिंप्री खुर्द) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते बुधवारी रात्री आठ वाजता जेवण करीत असताना त्यांचे मोठे बंधू कैलास गोकुळ बडगुजर आले व त्यांनी शिविगाळ सुरू केल्यानंतर त्यास जाब विचारल्यानंतर त्याने तु माझ्या मुलाला तुझे वडील दारू पिवून पेट्रोल पंपाजवळ पडला असल्याचे का सांगितले?, असा जाब विचारला व त्यावर सुनील बडगुजर यांनी तुझ्या मुलाची व माझी गाठभेट नाही, असे सांगितले मात्र त्यावर कैलास यांचे समाधान न झाल्याने त्यांनी दारासमोर पडलेला विळा उचलून डोक्यावर मारुन दुखापत केली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात सुनील बडगुजर यांच्या फिर्यादीवरुन संशयित कैलास गोकुळ बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार राजेंद्र कोळी करीत आहेत.
