भरधाव दुचाकी धडकल्या : वाघरेतील शेतकरी जखमी


Speeding two-wheeler collided : Farmer of Waghare injured अमळनेर : भरधाव दुचाकींमध्ये अपघात झाल्यानंतर वाघरे येथील शेतकरी गंभी रजखमी झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील मारवड ते धार रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ मंगळवार, 4 रोजी दुपारी तीन वाजता घडली. या प्रकरणी अपघात करून पसार झालेल्या दुचाकीस्वाराविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातानंतर दुचाकीस्वार पसार
शरद वेलचंद पाटील (35, वाघरे, ता.पारोळा) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे बंधू बापू वेलचंद पाटील (रा.वाघरे) हे दुचाकी (एम.एच.18 बी.बी.8806) ने मारवाड-धार रस्त्यावरून जात असताना समोरून भरधाव दुचाकी (एम.एच.19 सी.डी.4121) घेवून आलेल्या संशयित दरपण मुरलीधर पाटील (मारवड) याने जोरदार धडक दिल्याने बापू वेलचंद पाटील यांना गंभीर दुखापत झाली तसेच दुचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. या अपघात घडल्यानंतर दरपण मुरलीधर पाटील हा दुचाकी घेऊन पसार झाला. या प्रकरणी शरद पाटील यांनी मारवड पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार दुचाकीस्वार दरपण मुरलीधर पाटील (मारवडा, ता.अमळनेर) यांच्या विरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक मुकेश साळुंखे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !