जळगावात पाच स्टंटबाज बाईकस्वार पोलिसांच्याताब्यात
Five stunt bikers in Jalgaon police custody जळगाव : स्टंटबाज बाईकस्वारांविरोधात तक्रारी वाढल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी पाच अल्पवयीनांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. शहरातील मेहरूण तलाव ट्रॅक परीसरामध्ये रविवारी सकाळी टवाळखोर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बाईकवर स्टंटबाजी करतानाही कारवाई करण्यात आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारी वाढल्यानंतर कारवाई
मेहरूण ट्रॅक परीसरात सकाळी काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून सुसाट वाहने चालवून स्टंटबाजी केली जात असल्याची तक्रार एमआयडीसी पोलिसांना प्राप्त झाली होती. रविवार, 9 एप्रिल रोजी सकाळी हा प्रकार खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिसांना कारवाईच्या सूचना केल्या. सकाळी सात वाजता एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, योगेश बारी, समाधान टहाकळे, राकेश बच्छाव यांनी मेहरूण ट्रॅक गाठून स्टंटबाज विद्यार्थ्यांचा शोध सुरू करीत सीसीटीव्ही तपासून त्या पाच विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास गणेश शिरसाळे करीत आहेत.


