एकतास गावात शॉर्टसर्किटने मका पेटला : पाच लाखांचे नुकसान
Maize caught fire due to short circuit in Ektas village : loss of five lakhs अमळनेर : तालुक्यातील एकतास येथे ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किटने झाल्यानंतर आगीच्या ठिणक्या मक्यावर उडाल्याने तीन बिघे मका खाक होवून शेतकर्याचे तब्बल पाच लाखांचे नुकसान झाले.
शेतकर्याने केली भरपाईची मागणी
अमळनेर तालुक्यातील एकतास येथील प्रभाकर राजाराम पाटील यांचे एकलहरे शिवारात पाडसे रेल्वेस्टेशन जवळ गट नं 69 क्षेत्र 1 हेक्टर 27 आर अर्थात् तीन बिघे शेत आहे. त्यात त्यांनी रब्बी मक्याची लागवड केली होती मात्र मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आग लागल्याने मक्याचे नुकसान झाले. दोन लाख रुपयांचा 16 एम.एम.आकाराचा ठिबक सिंचन संच, पाईप लाईन, मक्याचे कणसे, चारा असा जवळपास 80 क्विंटल येणारा मका जळून खाक झाला. शेतकर्याचे एकत्रीतपणे जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले. शेतात काम करण्यासाठी तीन वाजेच्या सुमारास सालदार शेतात गेले असतांना शेत जळून खाक झाल्याचे त्यांना दिसल्यावर त्यांनी प्रभाकर पाटील यांना माहिती दिली. लागलेल्या आगीबाबत प्रभाकर पाटील यांनी संबंधित माहिती वीज कंपनीला दिली. त्यानंतर कळमसरे कक्षाचे अभियंता किशोर सुर्वे यांनी शेताची पाहणी करून सर्व माहिती घेतली.
