अमळनेरात धाडसी घरफोडी : 68 हजारांचा ऐवज चोरीला


Daring burglary in Amalner : 68 thousand stolen अमळनेर : शहरातील भालेराव नगरातील महिलेच्या घरात चोरट्यांनी भर दिवसात 68 हजारांचा ऐवज लांबवल्याची घटना शनिवार, 1 ते सोमवार, 10 एप्रिलदरम्यान घडली. या प्रकरणी अमळनेर पोलिसात दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघा संशयीतांविरोधात गुन्हा
कविता गणेश बोरसे (भालेराव नगर, धुळे रोड, अमळनेर) या भालेराव नगरात वास्तव्यास आहेत. त्या गावाला गेल्यानंतर संशयित दिनेश भावसार आणि आदित्य दिनेश भावसार (दोन्ही रा.अमळनेर) यांनी 40 हजार रुपये किंमतीचा 16 ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा, 15 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन व व 12 हजार 500 रुपये किंमतीची सोन्याची अंगठी असा एकूण 67 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवला. महिलेच्या तक्रारीवरून दिनेश भावसार आणि आदित्य दिनेश भावसार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संजय पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !