जळगावात धावत्या रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी तरूणाचा मृत्यू


जळगाव : जळगाव-भादली रेल्वे अप रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेखाली आल्याने एका अनोळखी तरूणाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अनोळखी तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन
जळगाव ते भादली दरम्यानच्या अप रेल्वे लाईनवरील खंबा क्रमांक (421 च्या 12 ते 10 ) दरम्यान धावत्या हमसफर एक्सप्रेसचा जोरदार धक्का लागल्याने 32 वर्षीय अनोळखी तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार, 12 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता घडली. लोकोपायलट गिरीश तांबे यांनी याबाबतची खबर शनीपेठ पोलिसांना दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार परीष जाधव यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचानामा केला. मयाताची ओळख पटविण्याचे आवाहन शनीपेठ पोलिसांनी केले आहे. तपास हवालदार परीष जाधव करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !