जळगाव खुर्द शिवारात इलेक्ट्रीक शॉर्टसर्किटने आग : 28 हजारांचा मका जळून खाक


जळगाव : तालुक्यातील जळगाव खुर्द शिवारात असलेल्या गोदावरी हॉस्पिटल शेजारील एका शेतात इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतातील 28 हजारांचा गुरांचा चारा जळाला. या संदर्भात बुधवारी नशिराबाद पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

वारंवारच्या घटनांमुळे शेतकरी संकटात
कैलास पांडुरंग लढे (53, जळगाव खुर्द) हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे जळगाव खुर्द शिवारातील शेत गट क्रमांक 383 येथे गोदावरी हॉस्पिटलचे पाठीमागे शेत आहे. या शेतात त्यांनी गुरांसाठी लागणारा चारा जमा केला होता. 5 एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अचानकपणे इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे शेतात आग लागली. लागलेल्या आगीत 28 हजार रुपये किमतीचा गुरांचा चारा जळून खाक झाला. या संदर्भात कैलास पांडुरंग लढे यांनी बुधवारी नशिराबाद पोलिसात तक्रार दिल्यानंतर अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल भाग्यश्री चौधरी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !