भरधाव दुचाकीच्या धडकेने दोघे वयोवृद्ध मित्र जखमी : चोपड्यातील दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा


जळगाव : भरधाव दुचाकींमध्ये धडक होवून अपघात झाल्याने दोन वृद्ध जखमी झाले. या प्रकरणी धरणगाव पोलिसात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव ते धरणगाव रोडवर असलेल्या कल्याणे फाट्याजवळील जिनिंगसमोर हा अपघात शनिवार, 8 रोजी घडला होता.

दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा
गजानन धनसिंग पाटील (61, रा.सतखेडा, ता.धरणगाव) हे शनिवार, 8 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता गजानन पाटील हे त्यांचे सहकारी दिलीप प्रल्हाद पाटील (62) यांच्यासोबत दुचाकी (एम.एच.19 डी.जे.2701) ने धरणगाहून सतखेडा येथे जात असताना कल्याणे फाटा जवळील श्रीजी जिनिंगसमोर येणारी दुचाकी (एम.एच.19 डी.टी.8860) वरील चालक वैभव गौतम गवळी यांनी जोरदार धडक दिल्याने गजानन धनसिंग पाटील आणि दिलीप प्रल्हाद पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. शिवाय त्यांच्या दुचाकीचे ही मोठे नुकसान झाले. उपचार घेतल्यानंतर बुधवारी रात्री गजानन धनसिंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीस्वार वैभव गौतम गवळी (चोपडा) याच्या विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक चंदुलाल सोनवणे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !