नाशिक जिल्ह्यातील शस्त्र तस्कर चोपडा ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात : दोन कट्ट्यांसह, पाच काडतूस जप्त
Nashik district arms smuggler Chopra in the net of Rural Police : Two knives, five cartridges seized चोपडा : चोपडा ग्रामीण पोलिसांनी शस्त्रांची तस्करी रोखत पाच आरोपींच्या मुसक्या बांधल्या असून अटकेतील पाचही संशयीत नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहेत. आरोपींकडून देशी बनावटीचे दोन पिस्टल, पाच जिवंत काडतूस व चारचाकी कार जप्त करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी सहा वाजता लासूर-सत्रासेन रस्त्यावर करण्यात आली.
या संशयीतांना अटक
अटकेतील संशयीतांमध्ये किरण कमलाकर शिंदे (24, लासलगाव, ता.निफाड), टिनू उर्फ दशरथ रामचंद्र पवार (35), रामदास विश्वनाथ दाभाडे (30), युवराज भगवान माळे (26), वाहन चालक केशव बंडूजी वखरे (46, सर्व रा.पिंपळगाव बसवंत, जि.नाशिक) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत. संशयितांकडून 60 हजार रुपये किंमतीचे दोन पिस्टल, पाच हजार रुपये किंमतीचे पाच जिवंत काडतूस, तीन लाख रुपये किंमतीची स्वीप्ट असा एकूण तीन लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई चोपडा ग्रामीण निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, एएसआय किशोर शिंदे, हवालदार लक्ष्मण शिंगाणे, हवालदार भरत नाईक, कॉन्स्टेबल सुनील कोळी, कॉन्स्टेबल प्रमोद पारधी, कॉन्स्टेबल विशाल जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.