आचेगावात भावंडांना मारहाण :  दोन संशयीतांविरोधात गुन्हा दाखल


Beating siblings in Achegaon: Case registered against two suspects भुसावळ : तालुक्यातील आचेगाव जयंती समितीचे अध्यक्षपद न मिळाल्याच्या रागातून भावंडांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली.

दोघा संशयीतांविरोधात गुन्हा
सदानंद प्रकाश सुरवाडे (21, आचेगाव, ता.भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, गुरुवारी रात्री आठ वाजता संशयित आदेश रवींद्र सुरवाडे व रवींद्र संभाजी सुरवाडे (आचेगाव) यांनी घरात अनधिकृतपणे प्रवेश करीत वरण वाढण्याच्या दांड्याने त्यांच्यासह त्यांच्या भावाला डोक्यावर मारहाण केली तसेच वाद सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या बहिण आम्रपाल सुरवाडे यांच्या कानशीलात आदेशने लगावली तसेच रवींद्र सुरवाडे यांनी शिविगाळ केली. या प्रकरणी दोघा संशयीतांविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !