भोरटेकच्या लाचखोर तलाठ्यासह महिला कोतवालांची जामिनावर सुटका


Kotwals along with Bhortek’s briber Talatha released on bail  जळगाव : सुट्टीच्या दिवशी पंधराशे रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी भडगाव तालुक्यातील भोरटेक बु.॥ गावातील तलाठी सलीम अकबर तडवी (44, भडगाव) व कोतवाल कविता नंदु सोनवणे (27, रा.तांदलवाडी, ता.भडगाव) यांना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता जळगाव एसीबीने अटक केली होती. संशयीताना जळगाव सत्र न्यायालयात शनिवारी हजर केले असता न्यायालयाने 15 हजारांच्या पी.आर.बॉण्डवर त्यांना जामीन मंजूर केला.

तलाठी कार्यालयात सापळा यशस्वी
भोरटेक गावातील 65 वर्षीय तक्रारदार यांची वडीलोपार्जित शेतजमीन भोरटेक बु.॥ तलाठी कार्यालयाच्या हद्दीमध्ये आहे. तक्रारदार यांचे वडील मयत झालेले असून या शेतजमिनीच्या सातबारा उतार्‍यावर तक्रारदार यांच्यासह सोबतच्या नऊ वारसांची नोंद घेण्यासाठी तलाठी यांनी यापूर्वीच 11 एप्रिल रोजी एक हजार रुपये लाच घेतलल्यानंतर शुक्रवारी पुन्हा तलाठी व कोतवाल यांनी दिड हजारांची लाच मागितल्याने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. लाच स्वीकारल्यानंतर तलाठी व कोतवाल यांना अटक करण्यात आली. शनिवारी संशयीताना जळगाव सत्र न्यायालयाचे न्या.वावरे यांच्या न्यायासनापुढे हजर केल्यानंतर त्यांची 15 हजारांच्या पी.आर.बॉण्डवर सुटका करण्यात आली. तपास जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !